हरवलेल्या तरुणाचे कुजलेले प्रेत आढळले विहीरीत

यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |  तालुक्यातील डोंगर कठोरा गावातुन चार दिवसापुर्वी हरवलेल्या विवाहीत तरुणाचे गावाजवळच्या विहिरीत प्रेत मिळाले असून  यावल पोलीसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली  आहे.

 

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की , गणेश दिलीप ढाके (वय  ३२ वर्ष रा. डोंगर कठोरा, ता. यावल) हा तरूण दि.  १८ नोव्हेंबरपासून हरवल्याची नोंद यावल पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. गणेश ढाके याचा मागील चार दिवसापासून सर्वत्र शोध सुरू असतांना अखेर आज मंगळवार दि. २२  नोव्हेंबर रोजी सकाळच्या सुमारास डोंगर कठोरा ग्रामपंचायतच्या गावातील विहीरीत गणेश  मृत अवस्थेत मिळुन आला. त्याचे  शव ग्रामस्थांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले.  गणेश ढाके यांचे शव  हे अत्यंत कूजलेल्या अवस्थेत असल्या कारणाने यावल ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन देशमुख, गावातील पोलीस पाटील राजरत्न आढाळे यांच्या उपस्थितीत जागेवरच मृतदेहाचा पंचनामा करून  मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले.  याबाबतची धनजय फालक यांनी खबर दिल्यावरून पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. गणेश हा डोंगर कठोरा गावात पत्नी,दोन मुल , आई या कुटुंबासोबत राहात होता.  मोलमजुरी करीत तो आपल्या कुटुंबाचा उदरर्निवाह करीत असे मात्र त्याने आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल का उचलले हे मात्र कळू शकले नाही. घटनेचा तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास करीत आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content