हरभरा खरेदीचा शेतकर्‍यांनी लाभ घ्यावा : राकेश फेगडे

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | नाफेडतर्फे आजपासून हरभरा खरेदी सुरू होत असून शेतकर्‍यांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन कोरपावली विकासोची चेअरमन राकेश फेगडे यांनी केले आहे.

 

तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या २०२२-२०२३ वर्षाच्या उत्पादीत रब्बी हंगामात केंद्र शासना कडुन किमान आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत नाफेड चे हरभरा खरेदी केंद्र यावल उप अभिकर्ता संस्था म्हणून तालुक्यातील कोरपावली विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीमार्फत हरभरा खरेदीसाठी नावनोंदणी जिल्हा पणन अधिकारी यांचे आदेशानुसार उद्या १ मार्च पासून सुरू होणार असल्याची माहीती सोसायटीचे चेअरमन राकेश फेगडे यांनी दिली आहे.

 

यावल तालुक्यातील शेतकर्‍यांनी नोंदणी साठी आधार कार्ड झेरॉक्स, बॅक पासबुक झेरॉक्स,  हरभरा पिकाचा ऑनलाईन चालु रब्बी हंगामाचा पिक पेरा नोंदविलेला  ७/१२ उतारा घेऊन कोरपावलीच्या विविध कार्यकारी सहकारी सोसायटी या संस्थेशी संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

 

दरम्यान, शासनाच्या वतीने शेतमालाची रक्कम शेतकर्‍यांनी दिलेल्या बँक खाती ऑनलाइन पद्धतीने जमा होणार आहे , त्यामुळे शेतकरी बांधवांनी आपली बँक खात्याची माहिती बिनचूक देण्यात यावी ; अन्यथा आपली रक्कम जमा होण्यास विलंब होईल किंवा चुकीच्या बँक खात्यामध्ये रक्कम वर्ग होऊ शकते , हमीभाव ५३३५ रू उत्पादकता १३५० किलो हेक्टरी मिळणार असल्याची माहीती राकेश वसंत फेगडे ,चेअरमन विविध कार्यकारी सोसायटी.कोरपावली तालुका यावल यांनी दिली .

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content