हतनूर धरणाच्या पाटचारीत वाहून गेलेल्या मेंढपाळाचा आढळला मृतदेह

यावल,  प्रतिनिधी । तालुक्यातील शिरसाड गावातील  गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या मेंढपाळाचा मृतदेह आज शुक्रवार १० सप्टेंबर रोजी पाटचारीत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.  त्याच्या अशा अक्समात मृत्यूमुळे गावावर  शोककळा पसरली आहे.

 

या संदर्भात मिळालेली माहीती अशी की, बुधवार  ८ सप्टेंबर रोजी सायंकाळी मेंढ्या पाटचारीत पाणी पिण्यासाठी जात असताना त्यांना तेथून हाकलण्याच्या प्रयत्नात असलेल्या विनोद यशवंत धनगर (वय ४० वर्ष रा. शिरसाड ता.यावल ) हा मेंढपाळ पाय घसरून हतनुर धरणाच्या पाटचारीत पडून बेपत्ता झाला होता. मेंढयांना हाकलण्याचा प्रयत्न करण्याच्या बेतात असतांना विनोद धनगर यांचा पाटचारीत पाय घसरला व तोल सुटुन चारीत पडला. पाटचारीमध्ये मोठया प्रमाणावर पाणी असल्याने त्यात पडुन धनगर बेपत्ता झाले.बुधवारी सायंकाळी त्यांच्या सर्व मेंढ्या गोलू धनगर ,कैलास धनगर व कुंदन धनगर यांनी गावात आणल्या.  यानंतर शिरसाड गावातून त्याचा शोध घेण्यासाठी त्याचे कुटुंबीय पाटचारीच्या दिशेने रवाना झाले.मात्र, दोन दिवस शोध घेऊनही विनोद मिळून आला नाही. तेव्हा आज सकाळी ११वाजेच्या सुमारास त्यांचा मृतदेह शिरसाड शिवारातील पाटचारीत मिळून आला. मेंढ्या चारत असताना दोन दिवसांपूर्वी पाटचारीत पाय घसरून विनोद यशवंत धनगर  बेपत्ता झाला होता.  पोलिसात जितेंद्र पांडुरंग धनगर यांनी दिलेल्या खबरी वरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत विनोद धनगर यांच्या पश्चात आई ,एक मुलगी, दोन मुले ,पत्नी असा परिवार आले.  पोलिस हवालदार अशोक जवरे यांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पोलीस अमलदार संजय देवरे करीत आहे.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!