स्व. निखिल खडसे यांच्या स्मरणार्थ अयोध्या नगर येथे पाणपोईचे उद्घाटन

जळगाव,लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | स्व. निखिल खडसे यांच्या स्मरणार्थ अयोथ्या नगर गणपती मंदिर याठिकाणी पाणपोईचे जिल्हा बँकेचे चेअरमन गुलाबराव देवकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

 

अयोध्या नगर या परिसरातील नागरिकांना व गणपती मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी उन्हाळ्यात थंड पाण्याची व्यवस्था स्व. निखिलभाऊ एकनाथराव खडसे यांच्या स्मरणार्थ अनंत झांबरे यांनी स्वखर्चाने यांनी करून दिली. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश चिटणीस एजाजभाई मलिक, महानगर जिल्हाध्यक्ष अशोक लाडवंजारी, माजी उपमहापौर सुनिल खडके, महनगर जिल्हा सरचिटणीस सुनिल माळी, जळगाव शहर विधानसभा क्षेत्र प्रमुख लिलाधर तायडे यांची उपस्थित होती. यशस्वीतेसाठी अनंत झांबरे, हेमत महाजन, वैभव सावदेकर, अविनाश वाणी, गणेश पाटील , राम पाडे यांनी कामकाज पाहिले. 

अनंत झांबरे यांनी स्वखर्चाने पाणपोई चालू केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगाव महानगराच्या वतीने गुलाबराव देवकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!
%d bloggers like this: