स्वच्छता मोहिमेद्वारे छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराजांची जयंती सह्याद्री प्रतिष्ठान चाळीसगाव च्या वतीने चाळीसगाव तालुक्यातील मल्हारगडावरील पाण्याच्या टाक्यांकडे जाणार्‍या रस्त्यावरील अडचणी दूर करून गडावर येणार्‍या लोकांना टाके पूर्णपणे पाहता यावेत यासाठी रस्ता मोकळा करुन आणि टाक्यातील कचरा साफ करून साजरी करण्यात आली.

मल्हार गडावरील पाण्याच्या टाक्यांकडे जाणार्‍या पायवाटेमध्ये मोठ्या प्रमाणावर काटेरी गवत आणि वाळलेले झाडे पडून हा रस्ता जवळपास बंद झाला होता. आज सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने श्रमदान करून या रस्त्यातील हे अडथळे काढून पायवाट मोकळी करण्यात आली असून दगडात कोरलेल्या पाण्याच्या टाक्यांमध्ये पडलेले वाळलेले झाडे काढून टाक्यांची स्वच्छता करण्यात आली. यानंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेची पूजा करून जयंती साजरी करण्यात आली.

यावेळी सह्याद्री प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष दिलीप घोरपडे, जिल्हा उपाध्यक्ष सचिन पाटील, जितेंद्र वाघ, नाना चौधरी, रविंद्र दुसिंग, गणेश पप्पु पाटील, राहुल पवार, बाळासाहेब सोनवणे, जितेंद्र वरखेडे, ललित चौधरी, पंकज माळी, मंगेश पाटे, मयूर भागवत पाटील, मुकूल भागवत पाटील, रोहन राठोड , प्रथमेश कदम, साई गणेश पाटील, यश संजय पवार आदी उपस्थित होते. यावेळी दिलीप घोरपडे यांनी मनोगत व्यक्त केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय कदम यांनी केले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content