स्पर्धा परीक्षेत के.के उर्दू चे सुयश

 

जळगाव, प्रतिनिधी । येथील अल फैज फाउंडेशन तर्फे उर्दू माध्यमच्या विद्यार्थ्यांसाठी जळगाव तालुका स्तरावर घेण्यात आलेल्या इ.७वी ९वी , अभ्यासक्रम व सामान्य ज्ञानावर आधारित स्पर्धा परीक्षेत भाग घेउन यश संपादन केले.

यात इयत्ता ९वी च्या गटात अनम फिरोजखान ने ४०० गुणां पैकी ३२८, अरशीन इरफान देशमुख ने हि ३२८,व सोबीया शेख परवेझ ने ३२२ गुण प्राप्त करुन शालेय स्तरावर वर प्रथम व द्वितीय क्रमांक प्राप्त करण्या बरोबर जनरल मेरीट लिस्ट मध्ये हि ७वा व ९ वा क्रमांक प्राप्त करुन टॉप टेनमध्ये स्थान प्राप्त केले. यशस्वी विध्यर्थीनीना मुख्याध्यापिका शमीम मलीक, अकिल खान, मुश्ताक भिसती, व वर्ग शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष व समस्त पदाधिकारी मंडळाने अभिनंदन करून भविष्यात ही अशीच प्रगती करण्याची अपेक्षा व्यक्त केली

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.