स्थानिकांना लसिकारणात प्राधान्य द्या : रोहिणी खडसे खेवलकर यांची मागणी

मुक्ताईनगर, प्रतिनिधी । तालुक्यातील लसीकरण केंद्रांवर स्थानिक नागरिकांनाच लस मिळावी मुक्ताईनगर तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य उपकेंद्रावर कोरोना लसीकरण सुरू करावे अशा मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मुक्ताईनगरतर्फे जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे खेवलकर यांनी तहसीलदारांना दिले. 

 सध्या कोरोना महामारीने थैमान घातले असून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी  नागरिकांना शासनाकडून प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात येत आहे यातील कोव्ह्याक्सीन (COVAXIN) या लसीसाठी ऑनलाईन नोंदणी करावी लागते. ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर तालुक्याबाहेरील इतर तालुक्यातील नागरिकांनासुद्धा  तालुक्यातील लसीकरण केंद्र निवडण्याचा पर्याय देण्यात येतो. लसीकरण केंद्रावर लस देण्यात येते. यामुळे त्या तालुक्यातील स्थानिक नागरिक लसीकरणा पासून वंचित राहतात. तरी ऑनलाईन नोंदणी करतेवेळी नोंदणी करणारा नागरिक ज्या तालुक्यातील रहिवासी असेल त्याला त्याच तालुक्यातील लसीकरण केंद्र मिळावे. जेणेकरून लसीकरण केंद्र असलेल्या तालुक्यातील नागरिक लसीकरणा पासून वंचित राहणार नाही. तसेच  मुक्ताईनगर तालुक्यासाठी उपलब्ध कोरोना प्रतिबंधक  लस आणि लसीकरण केंद्राची संख्या बघता मुक्ताईनगर तालुक्यासाठी हे अपुर्ण पडत असुन बहुसंख्य नागरिकांना लसीकरणापासुन वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तरी वाढत्या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी शासनाकडे  मुक्ताईनगर तालुक्यासाठी कोरोना प्रतिबंधक लसींचा मुबलक साठा उपलब्ध करून द्यावा तसेच योग्य नियोजन करून तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य उपकेंद्रावर लसीकरण केंद्र सुरू करावे, जेणेकरून लसीकरण केंद्रांवरील गर्दी कमी होऊन आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी होईल व कोणीही नागरिक लसीकरणापासून वंचित राहणार नाही  या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मुक्ताईनगरतर्फे जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे खेवलकर यांनी मुक्ताईनगर तहसीलदार यांना दिले. तसेच याची प्रत मा जिल्हाधिकारी यांना देण्यात आली

यावेळी बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख विजय सोनार, सुनिल काटे, शिवराज पाटील, रणजित गोयनका, मनोज हिवरकर,  निनाजी खोले ,उल्हास पाटील,गणेश कोळी ,सुशिल भुते ,राजू कापसे,उपस्थित होते

 

Protected Content