सौ. प्रतिभाताई इंग्लिश स्कुल बोदवड येथे मान्यवरांचा सत्कार

बोदवड, प्रतिनिधी  । येथील  सौ. प्रतिभाताई इंग्लिश स्कुल बोदवड येथे सेवानिवृत्त जवान व युवा पुरस्कार प्राप्त युवकाचा सत्कार करण्यात आला. 

 

सौ. प्रतिभाताई इंग्लिश स्कुल  येथे जामनेर तालुक्यातील  पिंपळगांव  गोलाईत येथील १७ वर्ष देश सेवा करून परतलेले जवान श्रीराम दशरथसिंह सिसोदिया व  भारत देशातील सर्वोत्कृष्ट युवा पुरस्कार मिळाल्या बद्धल भुसावळ येथील रंजीतसिंह राजपूत भुसावळ यांचा  मुख्याध्यापिका सौ.सिमाताई राजपूत व व्यवस्थापक श्री. बापूसिंह राणा यांनी सन्मान पत्र व शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. या कार्यक्रमाला श्री राजपूत करणी सेनेचे खान्देश कार्याध्यक्ष  विलाससिंह पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तसेच  विठ्ठलसिंह मोरे जिल्हा प्रमुख जळगाव , विजयसिंह राजपूत उद्योजक जळगाव,  दिलीपसिंह पाटील नांदगाव अध्यक्ष रावेर लोकसभा मतदार संघ काँग्रेस, संजयसिंह पाटील सर भुसावळ, नारायनसिंग पाटील,  नांदगांव, गजेंद्रसिंह सोलंकी नाडगाव, योगेश राणा एनगाव, सौ. प्रतिभाताई इंग्लिश स्कूल चे सर्व कर्मचारी व नाडगाव,नांदगाव , बोदवड चे समाज बांधव उपस्थित होते.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!