सोयाबीन पिक विमा योजनेत पाचोरा तालुका समाविष्ट करण्याबाबत निवेदन

पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | सोयाबीन पिक विमा योजनेत पाचोरा तालुका समाविष्ट करावा व विमा भरण्यासाठी अतिरिक्त १५ दिवसांची मुदत वाढ मिळावी या मागण्यांसंदर्भात आज या मागणीसाठी शिवसेनेतर्फे तहसिलदारांना निवेदन देण्यात आले.

याप्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अॅड. अभय पाटील, तालुका प्रमुख शरद पाटील, जि. प. सदस्य दिपकसिंग राजपूत, अमरसिंग पाटील, शहर उपप्रमुख अनिल सावंत, अविनाश पाटील, निलेश गवळी, अजय पाटील, विलास महाजन, साहेबराव पाटील, पप्पु जाधव, विलास पाटील, खंडु सोनवणे सह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

केंद्र सरकारने व राज्य सरकारने सन २०२२ – २०२३ या वर्षासाठी पिकविमा योजना जाहीर केलेली आहे. सदरच्या योजनेत पाचोरा तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पिकविमा योजनेचा लाभ मिळत नसुन पाचोरा तालुक्यात मोठ्याप्रमाणात सोयाबीन पिकाची लागवड यावर्षी शेतकत्यांनी केलेली आहे. जळगाव जिल्ह्यातील इतर काही तालुक्यातील शेतकऱ्यांना सोयाबीन पिकासाठी पिकविमा योजनेचा लाभ मिळत असतांना कोणतेही भौगोलीक वेगळेपण नसलेल्या पाचोरा तालुक्याचा केंद्र सरकारने व राज्य सरकारने समावेश करु नये ही बाब र्दुदैवाची आणि निषेधाची आहे. पाचोरा शिवसेना पाचोरा तालुक्यातील सोयाबीन उत्पादकांवरील या अन्यायाचा प्रथमतः निषेध करत शासनाचे प्रतिनिधी म्हणुन आपण तातडीने राज्य व केंद्र सरकारच्या निर्दशनास सदरची बाब आणुन सोयाबीन पिकासाठी पाचोरा तालुक्यातील शेतकऱ्यांना पिक विमा योजनेत सोयाबीन पिकासाठी सुध्दा विमा काढता यावा, यासाठी समावेश करावा व सोयाबीन सारख्या नाजुक पिकाच्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसानीस विम्याचे संरक्षण द्यावे. शासनाने याप्रमाणे न केल्यास शिवसेना आपल्या पध्दतीने आंदोलन करुल व त्याचे परिणामास सरकार जबाबदार राहील. अशा आषयाचे निवेदन शिवसेनेतर्फे तहसिलदार कैलास चावडे यांना देण्यात आले. सदरचे निवेदन नायब तहसिलदार मोहन सोनार यांनी स्विकारले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.