सोमवारी भाजपातर्फे वीजबिल होळी आंदोलन

शेअर करा !

 

जळगाव, प्रतिनिधी । लॉकडाऊनच्या काळात राज्यातील नागरीकांना भरमसाठ वीजबिले आली असून या वीजबिलांबाबत सरकारने रास्त सवलत द्यावी या मागणीसाठी भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा व महानगरतर्फे सोमवार २३ नोव्हेंबर रोजी या वीजबिलांची होळी करण्यात येणार आहे.

लाॅकडाऊनमुळे आर्थिक तणावाखाली असलेल्या नागरिकांना महाविकास आघाडी सरकारकडून मोठे शाॅक बसले. याबाबत महाराष्ट्रातील जनतेत जनआक्रोश निर्माण झाला आहे. महाविकास आघाडी सरकारने जनतेचा विश्वासघात केला. महाविकास आघाडी सरकारने भरमसाठ वीजबिलांबाबत रास्त सवलत द्यावी या मागणीसाठी भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा व महानगरतर्फे दि. २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता टावर चौक येथे वीजबिलांची होळी आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात जळगाव जिल्ह्यातील व महानगरातील त्रस्त जनतेने सहभागी व्हावे असे आवाहन आमदार तथा ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजुमामा भोळे, महानगर जिल्हाध्यक्ष दिपक सुर्यवंशी यांनी केले आहे.

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!