सोमवारपासून राष्ट्रवादीच्या वतीने दररोज जनता दरबार

जळगाव, प्रतिनिधी | शहरातील रहिवाशी व नागरिकांच्या विविध समस्यांचे निवारण करण्याकामी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महानगर (जिल्हा) अध्यक्ष अशोक लाडवंजारी यांनी सोमवार दि. १७ जानेवारीपासून दररोज जनता दरबाराचे आयोजन करण्यात येणार आहे.

 

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महानगरच्या वतीने नागरिकांच्या विविध समस्यांचे जसे की वैद्यकीय सेवेबाबत, महानगरपालिका, जिल्हा परिषद, तहसिलदार कार्यालय,संजय गांधी निराधार योजना,स्वस्त धान्य दुकानामार्फत मिळणारे धान्य वाटप, विद्यार्थ्यांना येणाऱ्या शैक्षणिक बाबतीत निवारण करण्यासाठी सोमवार दि. १७ जानेवारीपासून दररोज सकाळी १०.०० ते दुपारी १.०० या वेळात जनता दरबाराचे आयोजन करण्यात येणार आहे. यात नागरिकांच्या समस्या जाणून घेत त्या सोडवण्यासाठी पाठपुरावा करण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी आपल्या समस्या निवारणा कामी वरील वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालयात संपर्क साधावा. समस्या निवारण करण्याकामी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,महानगर (जिल्हा) अध्यक्ष अशोक लाडवंजारी, (मो. ९८६००२९१९१), उपाध्यक्ष अमोल कोल्हे (मो.९०२१८३९२६५), उपाध्यक्ष भगवान सोनवणे (मो.९८६०२०१३९९),सरचिटणीस सुनिल माळी (मो.नं.९८६००२८०८०), विशाल देशमुख (मो.८८३०३७७४२४) ,सुशिल शिंदे (मो.९४०४०४७४२४), अकिल पटेल (मो.९७३००७२५५५),राजु मोरे( मो.९८९०८७७५११), किरण राजपूत (मो.९८९०४५६४१७) यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content