मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा – सोमवारी तसेच आज देखील भाजपचे सोमय्या यांनी आयएनएस विक्रांत युद्धनौका प्रकरणी दाखल गुन्ह्याच्या चौकशीसाठी आर्थिक गुन्हे शाखेत हजेरी लावली. त्यानंतर सोमय्या यांनी प्रसार माध्यमाशी बोलतांना महाविकास आघाडी सरकारवर टीका करीत १२ आरोप केलेत, १२ गुन्हे दाखल करा असे आव्हान खा. संजय राऊत यांना दिले
आयएनएस विक्रांत युद्धनौका बचाव मोहीम राबविण्यात आली. यातील ५७ कोटी रुपये निधीचा अपहार केल्याप्रकरणी किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील यांच्याविरोधात माजी सैनिक बबन भोसले यांच्या तक्रारीवरून ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात जमा रक्कम १० कोटी रुपयांपेक्षा जास्त म्हणून याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. या गुन्ह्याच्या चौकशीसाठी भाजपचे किरीट सोमय्या यांची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सूरू असून खा. संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांनंतर सोमवारी तसेच आज देखील सोमय्या यानी आर्थिक गुन्हे शाखेत हजेरी लावली होती. यावेळी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. तसेच, मुख्यमंत्र्यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावर ईडीनं केलेल्या कारवाईचा देखील त्यांनी उल्लेख केला.
महाविकास आघाडीचे २६ घोटाळे बाहेर आले, १८ नेते अडकले, काहींची मालमत्ता जप्त तर काही कोर्टाच्या फेऱ्यामध्ये आणि काही जेलमध्ये तर काही बेलवर, काही हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत. ठाकरे परिवाराचीहि चौकशीही सुरू असून मुख्यमंत्र्यांच्याच मेहुण्याचीहि एक मालमत्ता जप्त झाली. आता बाकीच्यांचा नंबर आहे. हिंमत होती, तर ५७ कोटीं, ७५०० कोटी अमित शाहाना दिले, याची एफआयआर का नाही केली ? राऊतांनी १२ आरोप माझ्यावर केलेत, १२ एफआयआर दाखल कराव्यात, खुले आव्हान खा. संजय राऊतांना सोमय्यांनी केले आहे.