सोनाली दारकोंडे यांना “जिल्हास्तरीय क्रिडाशिक्षिका नारीशक्ती सन्मान” पुरस्कार जाहीर

पाचोरा, प्रतिनिधी | जळगाव जिल्हा शारीरिक शिक्षण क्रिडा शिक्षक महासंघ यांनी जळगाव जिल्हातील तालुकास्तरातून सर्वोत्तम महिला जिल्हास्तरीय क्रिडाशिक्षिका नारीशक्ती सन्मान पुरस्कारसाठी पाचोरा येथील जयकिरण प्रभाजी न्यू इंग्लिश मेडियम स्कूलच्या क्रिडा शिक्षिका सोनाली सुभाष दारकोंडे (तांदळे) यांची निवड झाली आहे.

 

सोनाली दारकोंडे यांना  जिल्हास्तरीय क्रिडाशिक्षिका नारीशक्ती सन्मान  दि. १० ऑक्टोबर रोजी जळगांव येथे प्रदान करण्यात येणार आहे.  क्रीडा क्षेत्रात खेळाडू कसे घडवायचे व उत्तम संघ खेळाडू घडवण्यासाठी विशेषता मुलींना खेळामध्ये त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना प्रोत्साहित करून खेळाचे महत्व पटवून देऊन खेळण्यासाठी मैदानात जिद्दीने कस खेळायचं व जीवनात पण कठीण प्रसंग अडचणी आल्यास कसा सामना करायचा हे पटवून दिले. शालेय स्पर्धा मुलींच्या व्हाॅलीबाॅल  संघास तालुकास्तरीय सामन्यांमध्ये फायनल विजेतेपद जिंकवून दिले. व जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये सुद्धा विशेष प्राविण्य उपांत्यपूर्व फेरीपर्यंत विजय मिळवून दिला होता. या चांगल्या कामगिरीची दखल घेऊन जळगाव जिल्हा शारीरिक शिक्षण क्रीडा शिक्षक महासंघ यांनी हा पुरस्कार सोनाली सुभाष दारकोंडे (तांदळे) यांना हा पुरस्कार जाहीर केला आहे. या यशाबद्दल जय किरण प्रभाजी न्यु इंग्लिश मिडियम स्कुल या संस्थेचे अध्यक्ष दिनेश बोथरा, उपाध्यक्ष गिरीश कुलकर्णी, सचिव जीवन जैन, क्रीडा समन्वयक प्रा. गिरीष पाटील, स्कूल कमिटी चेअरमन लालचंद केसवाणी, स्कूल कमिटी सचिव रितेश ललवाणी व सर्व संचालक मंडळ तसेच सी. ई. ओ. अतुल चित्ते, प्राचार्या पुष्पा पाटील, क्रीडा शिक्षक निवृत्ती तांदळे, पर्यवेक्षिका विद्या थेपडे व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!