जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सेवानिवृत्त स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक कृती समितीच्या वतीने आपल्या प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांसाठी शुक्रवारी २४ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्धनग्न मुक उपोषणाला सुरूवात करण्यात आली आहे. त्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराश्ट्र नागरी सेवा वेतनच्या नियमानुसार सर्व तेरा संवर्ग कर्मचाऱ्यांचे पदनामांतर करून समकक्ष स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदावर समाविष्ट करून नियमानुसार वेतन देण्यात यावे, कालबध्द पदोन्नती अंतर्गत पहिला व दुसरा लाभ नियमानुसार देण्यात यावा, वित्त विभागाच्या शुध्दीपत्रकाच्या नुसार १ ऑक्टोबर २००६ ते ३१ मार्च २०१० या कालावधीत देण्यात आलेल्या काल्पनीक वेतन वाढीचा फरक रोखीने देण्यात यावा यासह इतर प्रलंबित मागण्यांसाठी सेवानिवृत्त स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक कृती समिती जळगावच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी २४ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता सेवानिवृत्त झालेले कर्मचारी यांनी अर्धनग्न मुक उपोषण सुरू केले आहे.
याप्रसंगी वसंत वंजारी, रमेश जोशी, वसंत चोधरी, दशरथ निकम, ताराचंद गंगावणे, अनिल फुलगावकर, विजय जोशी, अंबर पाटील, रामचंद्र बेडीस्कर, युधाकर वाणी यांच्यासह आदी उपस्थित होते.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.