सेवानिवृत्त जवान संदिप कुंभार यांचे पिंपळगाव येथे जल्लोषात स्वागत!

पाचोरा, प्रतिनिधी | तालुक्यातील पिंपळगाव येथील संदिप कुंभार या जवानांनी १७ वर्षांची प्रदीर्घ सेवा बजावल्यानंतर नुकतीच तो सेवानिवृत्त झाला आहे. याबाबत गावकऱ्यांनी त्याचा गावात जल्लोषात स्वागत केला.

तालुक्यातील पिंपळगाव (हरे.) येथील संदिप दत्तु कुंभार हा जवान सन – २००४ मध्ये औरंगाबाद येथे शिपाई म्हणून सैन्य दलात भरती झाला होता. त्यानंतर जबलपुर येथे प्रशिक्षण घेवुन जम्मु काश्मिर, अलवर, मथुरा, जोथपुर, अशा विविध ठिकाणी तब्बल १७ वर्ष सेवा दिली. त्यांच्या प्रदिर्घ सेवेनंतर त्यांचा पाचोरा येथील राधाकृष्ण नगर येथे नातेवाईक आणि परिसरातील नागरिकांनी जलोषात स्वागत केले. यावेळी त्यांचा सहपरिवार सत्कार व सन्मान करण्यात आला. या छोटेखानी कार्यक्रमाचे अध्यक्ष रविंद्र पाटील हे होते. तर प्रमुख मार्गदर्शक विक्रम पाटील हे होते. विक्रम पाटील यांनी संदिप कुंभार यांना सामाजिक जीवन जगतांना कोणती काळजी घेशील याचा मुलमंञ दिला तर तरूणांनी त्याचा आदर्श घेऊन देशसेवा कशी करावी यावर अमुल्य मार्गदर्शन केले. याप्रसंगी राधाकृष्ण नगर, माउली नगर, अमृत नगर व देवदत्त नगरमधील जेष्ठ नागरिक व तरूणांकडुन संदिप कुंभार यांचा सहपरिवार सत्कार केला. आपल्या सत्काराला उत्तर देतांना संदिप कुंभार म्हणाले की, देशातील प्रत्येक घरातील एका जवानाने सैन्यात भरती होवुन देश सेवा करावी व आपल्या देशाची मान ऊंच राहील असे कार्य करावे. तर घरी असलेल्या एका भावाने काळ्या मातीची, माता पित्यांची सेवा करावी असे आवाहन ही त्यांनी तरुण पिढीला केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी राधाकृष्ण नगर, माउली नगर, अमृत नगर व देवदत्त नगरमधील जेष्ठ नागरिक व तरूणांनी परिश्रम घेतले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.