जळगाव प्रतिनिधी । आगामी मार्च महिन्यात आयोजित करण्यात आलेल्या सूर्योदय मराठी साहित्य संमेलनासाठी कविता पाठविण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
सूर्योदय सर्वसमावेशक मंडळाच्या अठराव्या वर्धापन दिनानिमित्त दलुभाऊ जैन चॅरिटेबल ट्रस्ट प्रायोजित एकदिवसीय राज्यस्तरीय सतरावे सूर्योदय मराठी साहित्य संमेलन मार्च महिन्यात आयोजित करण्यात आले आहे. अध्यक्षस्थानी जळगाव येथील कवी अशोक कोतवाल हे असतील. संमेलनाचे उद्घाटन कवी शशिकांत हिंगोणेकर यांच्या हस्ते होईल. कवी प्रा. बी. एन. चौधरी हे संमेलनाचे समारोपीय सत्राचे अध्यक्षस्थान स्वीकारतील. संमेलनात ङ्गशब्दझंकारफ सत्रांतर्गत कवीसंमेलन होईल. त्याचे अध्यक्षस्थान रेल्वे सुरक्षा बलाचे निवृत्त आयुक्त रमेश सरकाटे हे भूषवणार आहेत. कवींनी आपल्या दोन कविता २० जानेवारीपर्यंत सूर्योदय मंडळाचे सचिव डी. बी. महाजन यांच्या गीताई, गोविंदपपुरा, संभाजीनगर, जळगाव या पत्त्यावर पाठवण्याचे आवाहन मंडळाचे अध्यक्ष सतीश जैन, उपाध्यक्ष प्रवीण लोहार, सल्लागार साहेबराव पाटील यांनी केले आहे.