सुषमा अंधारे यांचे विभक्त पती शिंदे गटात करणार प्रवेश

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | अल्पावधीत राज्यभरात लोकप्रिय झालेल्या ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांचे त्यांच्यापासून विभक्त झालेले पती हे एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

शिवसेनेतील फुटीमुळे अनेक कुटुंबांमध्ये फुट पडली आहे. यात आता शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारे यांची भर पडली आहे. त्यांनी गेल्या दोन-तीन महिन्यात उध्दव ठाकरे यांची बाजू जोरदारपणे मांडली असून अल्पावधीत त्या प्रसिध्दीच्या झोतात आल्या आहेत. भल्या भल्या नेत्यांना त्यांनी जेरीस आणल्याचे दिसून येत असतांना आता शिंदे गटाने एक चतुर खेळी केल्याचे समोर आले आहे.

सुषमा अंधारे यांच्यापासून विभक्त झालेले त्यांचे पती वैजनाथ वाघमारे अडसरकर यांचा आज शिंदे गटात प्रवेश होणार आहे. ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमात वैजनाथ वाघमारे यांचा प्रवेश होणार आहे. याच कार्यक्रमात अभिनेत्री दिपाली सय्यद यांचाही प्रवेश होणार आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content

%d bloggers like this: