सुशांत सिंह राजपूतच्या रुममेटला अटक

 

 

मुंबई : वृत्तसंस्था । अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात आता एनसीबीने त्याचा मित्र आणि रुममेट सिद्धार्थ पिठानीला अटक केली आहे.

 

पिठानीला हैदराबादमधून ताब्यात घेण्यात आलं. लवकरच त्याला मुंबईत आणणार आहेत .

 

षडयंत्र रचल्याच्या आरोपावरुन सिद्धार्थला अटक करण्यात आली आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला कोणतं नवं वळण लागणार असा प्रश्न उभा राहत आहे.

 

 

सीबीआयही तपास करत होती. त्याची मैत्रिण रिया चक्रवर्तीलाही अटक करण्यात आली होती. सुशांतला आपला भाऊ शौविक चक्रवर्तीच्या मदतीेने ड्र्ग्स पुरवल्याचा आरोप तिच्यावर होता. या प्रकरणाला अनेक वळणं मिळत होती. या प्रकरणातून पुढे अनेक सेलिब्रिटींना तपासाला सामोरं जावं लागलं होतं.

 

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने मुंबईतील त्याच्या राहत्या घरी आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येमागे काय कारण होते हे अद्याप समजलेले नाही. मात्र नैराश्य आल्याने त्याने आत्महत्या केली असा अंदाज आहे. सुशांत सिंह राजपूत हा पवित्र रिश्ता या मालिकेतून घराघरात पोहचला होता. तर त्याने हिंदी सिनेसृष्टीत काय पो छे, पीके, शुद्ध देसी रोमान्स, छिछोरे अशा सिनेमांधूनही काम केलं होतं. त्याच्या आत्महत्येमुळे हिंदी सिनेसृष्टी हादरली

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.