सुशांत आत्महत्या : रियाच्या भावाची ईडीकडून १८ तास कसून चौकशी !

शेअर करा !

मुंबई (वृत्तसंस्था) अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी रिया चक्रवर्तीनंतर आता तिचा भाऊ शोविकची सलग दुसऱ्या दिवशी ईडीनेतब्बल १८ तास कसून चौकशी केली.

 

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात ईडीकडून मनी लाँड्रिंगच्या अँगलने ईडीकडून तपास केला जात आहे. शुक्रवारी रिया चक्रवर्तीची ईडीकडून चौकशी करण्यात आली. तब्बल ८ तास ही चौकशी सुरू होती. शुक्रवारी रियाने तिच्या नावावर ३ कंपनी देखील आहेत. मात्र इतर प्रश्नांची उत्तरे देणे तिने टाळले होते. या प्रकरणी रियाच्या भावाची शनिवारी चौकशी करण्यात आली. तब्बल १८ तास ईडीकडून ही चौकशी सुरू होती. दरम्यान, जवळपास सर्व प्रश्नांची उत्तरे ‘मला माहित नाही’ किंवा ‘मला कसं तरी होत आहे’, अशी दिली आहेत. त्याचबरोबर शुक्रवारी सुशांतची बिझनेस मॅनेजर श्रुती मोदी हिची देखील चौकशी झाली. सीबीआयने रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती तसेच आई-वडिलांवर गुन्हा दाखल केला आहे.

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!