सुशांतसिंग मृत्यूच्या तपासात सीबीआयचा निष्कर्ष पोलिसांसारखाच असेल — पोलीस आयुक्त

शेअर करा !

 

मुंबई : वृत्तसंस्था| सुशांत मृत्यूचा तपास सीबीआयमार्फत केला जात आहे. मला खात्री आहे की जो निष्कर्ष सीबीआयकडून काढला जाईल तो निष्कर्ष आमच्या तपासाशी मिळताजुळताच असेल., असा विश्वास मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी व्यक्त केला.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूच्या घटनेला जवळपास सहा महिने झाले आहेत. अद्यापही नक्की काय घडलं याचं कोडं उलगडलेलं नाही. सुरूवातीच्या काळात मुंबई पोलीस सुशांत मृत्यू प्रकरणाचा तपास करत होते. त्यानंतर जनभावना लक्षात घेता हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आले. सीबीआयच्या तपासातून अनेकविध पैलू समोर आले पण अद्याप सुशांतच्या बाबतीत नक्की काय घडलं? याचं उत्तर सीबीआयने दिलेलं नाही. याच दरम्यान, मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी सुशांत प्रकरणातील सीबीआयच्या तपासाबाबत महत्त्वाचं भाष्य केलं आहे.

“मला खात्री आहे की सीबीआयचे अधिकारी लवकरच अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचतील. सर्वोच्च न्यायालयानेदेखील आम्ही केलेल्या तपासाला अतिशय ‘प्रोफेशनल’ तपास असं म्हटलं होतं. , असेही ते म्हणाले

३० डिसेंबरला सुशांत मृत्यू प्रकरणाच्या तपासाबाबत सीबीआयकडून माहिती देण्यात आली होती. “सीबीआय अधिक व्यापक आणि तंत्रशुद्ध पद्धतीने तपास करत आहे. वैज्ञानिक बाबीदेखील तपासल्या जात आहेत. तपासादरम्यान कोणताही विविध कंगोरे तपासले जात असून कोणतीही बाब दुर्लक्षित केली जात नाहीये”, अशी माहिती सीबीआयकडून देण्यात आली होती.

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!