सुशांतचा खून नव्हे तर आत्महत्याच : एम्सच्या अहवालाचा निष्कर्ष

एम्स रुग्णालयामधील टीमने सीबीआयकडे अंतिम रिपोर्ट सोपवला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । अभिनेता सुशांतसिंह राजपूत याचा खून झाला नसून त्याने आत्महत्याच केली असल्याचा निष्कर्ष एम्सच्या डॉक्टर्सच्या पथकाने आपल्या अहवालात केला आहे.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह मृत्यू प्रकरणी मोठ्या प्रमाणात दावे-प्रतिदावे करण्यात आले. यावरून त्याचा खून की आत्महत्या यावर मोठी चर्चा झाली. या दरम्यान, एम्स रुग्णालयामधील टीमने सीबीआयकडे अंतिम रिपोर्ट सोपवला आहे. या रिपोर्टमध्ये हत्येचा दावा पूर्पणणे फेटाळण्यात आला असून सुशांतने आत्महत्या केल्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.

एम्स रुग्णालयाकडून सुशांत सिंहच्या मृत्यूचं नेमकं कारण शोधण्यासाठी प्रयत्न सुरु होता. यासाठी डॉक्टर सुधीर गुप्ता यांच्या नेतृत्त्वाखाली तज्ञ डॉक्टरांची एक टीम तयार करण्यात आली होती. डॉक्टरांच्या टीमने अभ्यास पूर्ण करुन सीबीआयकडे रिपोर्ट सोपवला होता. सीबीआयने एम्स रुग्णालयाकडे पोस्टमॉर्टम तसंच व्हिसेरो रिपोर्टचा अभ्यास करण्याची विनंती केली होती. या अनुषंगाने एम्सचे डॉक्टर सुधीर गुप्ता यांनी सुशांतचा मृत्यू आत्महत्येमुळे झाला असून हत्येचा दावा फेटाळला असल्याचं सांगितचे वृत्त एका वृत्तवाहिनीने केले आहे. हा अहवाल सीबीआयला सोपविण्यात आला आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.