सुरवाडा बु. येथील निकृष्ट दर्जाच्या कामांची चौकशी करा : राजाराम सुरळकर

बोदवड. प्रतिनिधी | तालुक्यातील सुरवाडा बुद्रुक येथील ग्राम पंचायत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांचा विकास करणे अंतर्गत कामे मंजूर झालेली आहे. परंतु, सदरची कामे ही अंदाजपत्रकात नमूद केलेल्या तांत्रिकबाबी नुसार कामाची गुणवत्ता तसेच कामाचे लांबी, रुंदी, उंची. यांचे प्रमाणात विसंगती आहे.  त्यामुळे सदर सुरू असलेल्या कामांची मूल्यमापन व प्रत्यक्ष पाहणी करून कामाची बिले अथवा निधी हा चौकशी करूनच बिल देण्यात यावे अशी मागणी नागसेन राजाराम सुरळकर यांनी केली आहे.

 

ग्रामपंचायतीचे सुरवाडा बुद्रुक येथील मागील पाच वर्षांमध्ये अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांचा विकास करणे या योजनेतून कामे मंजूर झाली होती. परंतु, प्रत्यक्षात कामे ही केली नसून कागदोपत्री कामे दाखवून कामाचा निधी लाटण्याचा प्रयत्न हा संबंधित शाखा अभियंता तसेच ग्रामसेवक यांनी भ्रष्टाचार करून काढण्यात आलेला आहे.
चौकशीच्या वेळेस आपणास निदर्शनास येईल याची शक्यता नाकारता येत नाही. जुन्याच मंजूर व कागदोपत्री झालेल्या कामावरच सध्याच्या परिस्थितीत नवीन मंजूर कामे ही, त्याच जुन्या न झालेल्या कागदोपत्री कामावरती, मंजूर असलेल्या नवीन कामेही त्याच कामावर नवीन मंजूर कामे ही केली जात आहे. त्याकरिता मागील पाच वर्षांमध्ये सुरवाडा बुद्रुक ग्रामपंचायतीला किती कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे व सध्याच्या प्रशासकीय मान्यतेच्या कामांचा तफावत लक्षात घेण्यात यावा व सखोल चौकशी करून संबंधित शाखा अभियंता व ग्रामसेवक यांच्यावर भ्रष्टाचार केल्याने व शासनाची दिशाभूल केल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी.

याकरिता आपल्या स्तरावरून चौकशी करण्यात यावी व संबंधित अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी. तोपर्यंत कामांची मूल्यमापन व प्रत्यक्ष पाहणी होत नाही, तोवर कामाची बिले अथवा निधी हा चौकशी करूनच बिल देण्यात यावे अशी मागणी तक्रारदार नागसेन सुरळकर यांनी केली आहे.

Protected Content