सुरक्षारक्षकाची दुचाकी चोरट्यांनी लांबवली; शहर पोलीसात गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । शहरातील गोविंदा रिक्षा स्टॉपजवळील पटेल प्लाझा येथील तीसऱ्या मजल्यावर असलेल्या मॅक्स लाईफ इन्शुरन्स कंपनीतील सुरक्षारक्षकाची दुचाकी चोरट्यांनी लांबवली. शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

 ही घटना ३० नोव्हेंबर रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेच्या दरम्यान घडली. राजेश भगवान मिसाळकर (पाटील, वय ३३, रा. शिव कॉलनी) या सुरक्षारक्षकाची दुचाकी (एमएच १९ बीबी १८८०) चोरट्यांनी लांबवली आहे. मिसाळकर हे नेहमीप्रमाणे ३० तारखेला ड्यटीवर आले होते. यावेळी त्यांनी पटेल प्लाझाच्या समोर पार्कींमध्ये दुचाकी उभी केली होती. सायंकाळी सहा वाजता ते कामानिमित्त खाली आल्यानंतर त्यांना दुचाकी मिळुन आली नाही. या प्रकरणी मिसाळकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content