सुप्रिम कॉलनीत बेकायदेशीर देशी दारूची वाहतूक; दोघांवर गुन्हा

शेअर करा !

जळगाव प्रतिनिधी । सुप्रिम कॉलनी परिसरात बेकायदेशीर देशी दारूची वाहतूक करणाऱ्या दोघांवर एमआयडीसी पोलीसांनी कारवाई करत दुचाकीसह ३७ हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, एमआयडीसी सेक्टरमधील सुप्रिम कॉलनी परिसरात बेकायदेशीर दारूची वाहतूक होत असल्याची माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनायक लोकरे यांना दुपारी मिळाल्यानंतर त्यांनी पथक तयार करून पोलीस उपनिरीक्षक संदीप पाटील, पोलीस नाईक सचिन मुंडे, पो.कॉ. सतिश गर्जे, पो.कॉ. विजय बावस्कर आणि पो.कॉ. मुकेश पाटील यांना घटनास्थळी रवाना केले. एमआयडीसीतील वेगा कंपनीच्या समोर दुचाकी क्रमांक (एमएच १९ बीएच ५०२९) दुचाकीवर देशी दारूचे दोन बॉक्स घेवून जात असतांना संशयित आरोपी प्रभाकर भागवत चांदेलकर (वय-३०) आणि कैलास जानराव कोळी (वय-२७) दोन्ही रा. सुप्रिम कॉलनी यांना दोघांची एमआयडीसी पोलीसांनी तपासणी केली असता बेकायदेशीर दारूची वाहतूक करतांना आढळून आले. पो.कॉ. मुकेश पाटील यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात दारूबंदी कायद्यांन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास एमआयडीसी पोलीस कर्मचारी करीत आहे.

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!