सुनसगाव येथे नवरात्रीनिमित्ताने कोरोना लसीकरण शिबीर

जामनेर, प्रतिनिधी | तालुक्यातील सुनसगाव फाटा येथील भवानी माता मंदिरावर नवरात्रानिमित्त दि. ९  ते १४  ऑक्‍टोबर दरम्यान कोरोना लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

 

 

भवानी माता मंदिरावर आयोजित कोरोना लसीकरण शिबिराच्या शुभारंभप्रसंगी सुनसगाव उपसरपंच दत्ता साबळे, अनिल पाटील, विष्णू वाघ, बंडू पाटील, महेश पाटील, ग्रामसेवक हरी सातव, डॉ. अश्विनी वाघ   उपस्थित होते. तसेच यांच्यासह भवानीमाता मंदिर ट्रस्टचे चेअरमन व सदस्य यावेळी उपस्थित होते. भवानी माता मंदिर सुनसगाव चेअरमन सेक्रेटरी व सामाजिक कार्यकर्ते दत्ता साबळे यांच्या मार्गदर्शनातून मंदिरावर सामाजिक उपक्रम राबवावे या उद्देशाने भक्तांसाठी कोरोना लसीकरण शिबीर सप्ताह राबवला जाणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिक व भाविक भक्तांनी कोरोना लसीकरणाचा लाभ घ्यावा असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!