सीएम नव्हे पीएम बदला : कॉंग्रेसची मागणी

नवी दिल्ली वृत्तसंस्था | गुजरातमधील अपयश हे मुख्यमंत्री बदलण्याने पुसले जाणार नाही, असे नमूद करत देशहितासाठी सीएम नव्हे तर पीएम बदला अशी मागणी कॉंग्रेसने केली असून ट्विटरवर याबाबत मोहिम सुरू केली आहे.

 

 

गुजरातचे मुख्यमंि विजय रुपाणी यांनी शनिवारी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर आज भूपेंद्र पटेल यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. पटेल पुढील काही दिवसांत मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. या प्रकाराबाबत कॉंग्रेसने मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

 

कॉंग्रेसने ट्विटरवर सीएम नही पीएम _बदलो ही मोहीम सुरू केली असून मोदी सरकारवर   निशाणा साधला आहे.  आपल्या ट्विटर अकाऊंटवरून कॉंग्रेसने याबाबत काही ट्विट्स केली आहेत. भाजपा सर्व ठिकाणी आणि सर्व राज्यांमध्ये अयशस्वी राहिली आहे. भाजपाने संपूर्ण भारतालाच अपयशी ठरवलं. मुख्यमंत्री बदलल्याने पंतप्रधानांचे अपयश काही झाकले जाणार नाही असं म्हणत कॉंग्रेसने टीकास्त्र सोडलं आहे. श्रेय स्वत:ला घ्यायचं आणि दोष दुसर्‍याला द्यायचा हाच मोदींचा मंत्र असल्याचं देखील अन्य एका ट्विटमध्ये कॉंग्रेसने म्हटलं आहे.

देशात सुरू असलेल्या कोरोना लसीकरणावरून देखील कॉंग्रेसने जोरदार टीका केली आहे. आपल्या लोकांचं आधी लसीकरण करुन घेऊन कोरोनाच्या संकटावर मात करणे हा सर्वात खात्रीशीर उपाय आहे. मोदी सरकारला ही साधी गोष्ट का कळली नाही? मोदी सरकार आपलं अपयश लपवण्याऐवजी ते स्वीकारण्याची भूमिका कधी घेणार? असं कॉंग्रेसने एका ट्विटमध्ये म्हटलं आहे. तसेच या ट्विटमध्ये संपूर्ण लसीकरण झालेल्या देशांमध्ये भारत इतर प्रगत देशांपेक्षा फार मागे असल्याचं आकडेवारीतून दाखवण्यात आलं आहे. याआधी देखील कॉंग्रेसने विविध मुद्द्यांवरून मोदींवर निशाणा साधला आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!