रोहिणी खडसे यांनी घेतली जलसंपदामंत्री पाटील यांची भेट

मुंबई : वृत्तसंस्था । जिल्ह्यातील सिंचन योजनांसाठी गरजेनुसार निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे – खेवलकर यांना दिले आहे.

आज जलसंपदामंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांची जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी  बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे खेवलकर यांनी  मुंबई येथे भेट घेऊन मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रातील बोदवड परिसर उपसा सिंचन योजना, कुऱ्हा- वढोदा -इस्लामपुर उपसा सिंचन योजना, मुक्ताई उपसा सिंचन योजना, वरणगाव -तळवेल उपसा सिंचन योजना या अपुर्ण अवस्थेत असलेल्या उपसा सिंचन योजनांची आढावा बैठक घेऊन निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली

यावर जयंत पाटील यांनी पुढील आठवड्यात उपसा सिंचन योजनांची आढावा बैठक घेण्यात येईल व निधीची उपलब्धता करून देण्यात येईल असे आश्वासन दिले

यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष , जि प सदस्य रविंद्र पाटील, पं स सदस्य दिपक पाटील, रावेर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे  तालुकाध्यक्ष सचिन पाटील उपस्थित होते

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!
%d bloggers like this: