साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयात साजरी व्हावी

भा. ज. पा. अनुसूचित जाती मोर्चाचे प्रांताधिकारी यांना निवेदनाद्वारे मागणी

पाचोरा- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।   साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांची जयंती सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयामध्ये साजरी करण्यात यावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे अनुसूचित जाती मोर्चा जळगाव जिल्हा कार्यकारिणी सदस्य यांनी आज दि. १५ जुलै रोजी उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

 

दिलेल्या  निवेदनाचा आशय असा की, साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांची जयंती सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयामध्ये साजरी करण्यात यावी.  ज्या कार्यालयामध्ये जयंती साजरी केली जाणार नाही त्या कार्यालयावर कठोरात कठोर कार्यवाही करण्यात यावी. तसेच दि. १ ऑगस्ट रोजी जळगाव जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयामध्ये जाऊन अण्णाभाऊ साठे जयंती यांची जयंती साजरी केली जात आहे का ? या बाबतची माहिती घेणार आहेत व ज्या कार्यालयामध्ये जयंती साजरी होणार नाही त्या कार्यालयावर आंदोलन करणार येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.  या निवेदनाच्या अनुषंगाने शासकीय कार्यालयांना आदेश देण्यात यावेत. अशा मागणीचे निवेदन भारतीय जनता पार्टीचे अनुसूचित जाती मोर्चा जळगांव जिल्हा कार्यकारिणी सदस्यांतर्फे उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल यांना देण्यात आले आहे. निवेदन देते वेळी जिल्हा कार्यकारिणी सदस्य प्रकाश कांबळे, सुकदेव आव्हाड, राजेंद्र चव्हाण, राजु कोतकर, नाना भालेराव, रवि बागुल उपस्थित होते.

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.