भुसावळ संतोष शेलोडे । आजवर तालुक्यात कोरोना बाधीत रूग्ण आढळून न आल्याने शहरवासी काही प्रमाणात निर्धास्त असतांना आज येथील एक रूग्ण पॉझिटीव्ह आढळून आल्याने खळबळ उडाली असून नागरिकांनी आता लॉकडाऊनचे तंतोतंत पालन करण्याची आवश्यकता असल्याचे अधोरेखीत झाले आहे.
लॉकडाऊन सुरू होऊन एक महिना उलटला तरी अद्याप भुसावळमध्ये कोरोना बाधीत रूग्ण आढळून आला नव्हता. मध्यंतरी नंदुरबार येथील रूग्णाशी संबंध असल्याच्या संशयातून शहरातील दोन संशयितांची चौकशी करण्यात आली होती. यानंतर मात्र शहरातील लॉकडाऊन काही प्रमाणात शिथील झाले होते. यातच आज शहरातील रूग्ण कोरोना पॉझिटीव्ह आढळून आला आहे.
भुसावळ शहरातील पॉझिटीव्ह रूग्ण महिला ४३ वर्षाची असून तिच्यावर जिल्हा शासकीय वैद्यकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या माध्यमातून शहरात कोरोनाचा शिरकाव झाला असून भुसावळकरांनी आता सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता असल्याचे स्पष्ट झाले आहे.
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
वेबसाईट : https://livetrends.news
फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01
ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News
युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH
इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news
व्हाटसअॅप क्रमांक : ९३७०४०३२००