सावदा शहरातील विजबिल माफ करा ; महाविकास आघाडीची मागणी

 

सावदा, प्रतिनिधी । शहरासह परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे शहरातील सर्व व्यवहार तीन महिन्यापासून लॉकडाऊन सर्व व्यवहार बंद असल्याने या काळातील विज बिल माफ करावे अशी मागणी महाविकास आघाडीचे कार्यकर्त्यांनी महावितरणचे कार्यकारी अभियंता सपकाळे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

महाविकास आघाडीतर्फे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरात कोरोनाचा विषाणूजंन्य व्हायरस रोखण्यासाठी प्रशासनाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू असून, शहरवासियांनी सावदा शहरात कोरोनाचा विषाणूजंन्य व्हायरस रोखण्यासाठी नगरपालिका, पोलीस, आरोग्य विभाग आणि म. रा.वि.वि. कं. ने आजपावेतो शर्थीचे प्रयत्न केलेले आहेत. तसेच कोविड १९ चे अनुसंघाने आजपावेतो ३६ रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली असून भीती व्यक्त केली जात आहे. यामुळे शहरातील अनेक भागात प्रतिबंध करण्यात आलेले आहे. गेल्या तीन महिन्यांपासून संपूर्ण शहरवासीय लॉकडाऊनच्या विळख्यात असल्याने बंदीस्त झालेले आहेत. परिणामी घरातच आहे. येथील शहरात ७०%रहिवासी शेतकरी आहेत. काही व्यावसायिक आणि बाकीचे हातमजूर असल्यामुळे त्यांचा रोजगार बंद पडलेला आहे. त्यांना रोजगार मिळेल तर त्यांचे कुटुंबीयांची कसेबसे उदरनिर्वाह करीत पालनपोषण करीत आहेत. त्यामुळे त्यांना असंख्य वेळा कठीण अडचणीशी सामना करावा लागतो. लॉकडाऊन उघडल्यावर शाळा, कॉलेज त्यांची फी, शालेय गणवेश, बियाणे, शेती अवजारे, खते आदि असंख्य अडचणी त्यांच्या समोर आ, वासून उभे आहेत. परीणामी ते आत्महत्येचा मार्ग स्वीकारू शकतात. हे टाळण्यासाठी शहरवासियांना दिलासा देण्यासाठी कोविड १९ च्या काळातील तीन महिन्यांचे विजबिल माफ करून दिलासा द्यावा अशी मागणी गटनेते, नगरसेवक, फिरोजखान हबीबुल्लाखान पठाण, माजी नगरसेवक लाला चौधरी, युवासेना जिल्हा सरचिटणीस सुरज परदेशी, फिरोजलेप्टी यांनी आदि कार्यकर्तेच्या साक्षरी ने लेखी निवेदन येथील कार्यकारी अभियंता यांना दिले आहे. निवेदनाचे प्रती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच उर्जामंत्री यांच्याकडे फॅक्सद्वारे पाठविण्यात आले आहे.

Protected Content