सावखेडा शिवारात अज्ञात तरुणाचा खून; तालुका पोलीसात गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील सावखेडा शेत शिवारात अज्ञात २५ ते ३० वर्षीय तरूणाचा खून झाल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. मयत तरूणाची ओळख पटलेली नाही. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील सावखेडा शिवाजी कोतीक पाटील रा.वैजनाथ, ता. एरंडोल यांच्या शेतातील बांधावर मंगळवारी सकाळी बाभळीच्या झाडाखाली एका अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळून आला. डोक्यात मार लागल्याने चेहरा ओळखू येत नाही. प्रारंभी या घटनेत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. ही घटना उघड झाल्यानंतर तालुका पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविकांत सोनवणे, वासुदेव मराठे, सतीश हळणोर यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेतली मृतदेहाचा पंचनामा करून तो जिल्हा रुग्णालयात आणला. दरम्यान, शवविच्छेदनात तरुणाचा मृत्यू डोक्यात मार लागल्याने झाल्याचा अहवाल डॉक्टरांनी दिला, त्यामुळे सायंकाळी या प्रकरणात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, तरूणा खून कोणी, केव्हा व का करण्यात आला याचा शोध तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी करीत आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.