साळवा शिवारात गावठी हातभट्टी पोलीसांची धाड; एकावर गुन्हा

धरणगाव प्रतिनिधी । तालुक्यातील साळवा येथील शिवारात पोलीसांनी आज दुपारी गावठी हातभट्टी उध्दवस्त करून सुमारे ४५ हजार रूपये किंमतीचे रसायन नष्ट केले आहे. पोलीसांना पाहून संशयित आरोपी पसार झाला आहे. धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील साळवा शिवारात गेल्या अनेक दिवसांपासून गावठी हातभट्टी सुरू असल्याची गोपनिय माहिती धरणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांना शनिवार २० नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता मिळाली. धरणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस पथकांने दुपारी ४ ते ५ वाजेच्या सुमारास साळवा शिवारात धडक कारवाई करत सुरू असलेली गावठी हातभट्टी उध्दवस्त केली. या कारवाईत सुमारे ४५ हजार रूपये किंमतीचे कच्चे व पक्के रसायन नष्ट करण्यात आले. संशयित आरोपी सुरेश चंद्रसिंग भिल रा. साळवा ता. धरणगाव जि.जळगाव हा पोलीसांना पाहून फरार झाला आहे. ही कारवाई गोपनिय शाखेचे मिलींद सोनार, विनोद संदानशिव, समाधान भागवत यांनी केली. याप्रकरणी संशयित आरोपीविरोधात धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!