अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील शिरसाळे येथे सार्वजनिक शौचालय वापरण्याच्या कारणावरून एका महिलेला दीर व दिराणी यांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सोमवारी ८ मे रोजी दुपारी २ वाजता मारवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील शिरसाळे गावात प्रणिता संजय जैन या महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. रेशन दुकान चालवून त्या आपला उतरनिर्वाह करतात. रविवार ७ मे रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास त्यांच्या घराच्या मागच्या ठिकाणी असलेल्या सार्वजनिक शौचालय येथे जात असताना त्यांचा दीर महेश रमेशचंद जैन आणि दीरानी अनिता महेश जैन यांनी सार्वजनिक शौचालय वापरण्यास मज्जाव करत काठीने मारहाण करून गंभीर दुखापत केली. तसेच जीवेठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर महिलेने सोमवारी ८ मे रोजी दुपारी २ वाजता मारवड पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून महेश रमेशचंद जैन आणि अनिता महेश जैन या दोघांवर मारवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक भरत गायकवाड करीत आहे.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.