सायकलवरून जनजागृती ; कोरोनायोद्ध्याची प्रशंसा

 

 

यावल :  प्रतिनिधी  ।  कोरोना संक्रमण महामारीच्या संकटात शासनाच्या माझे कुटुंब माझी जबाबदारी या जनजागृतीसाठी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात सायकलद्वारे भ्रमण करणाऱ्या ध्येयवादी तरूणास महसुलतर्फ प्रशंसापत्र देण्यात आले .

 

कोरोना विषाणु संसर्गाच्या  संकटात नागरीकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी हा  विधायक दृष्टीकोन  घेवुन सायकलीद्वारे संपुर्ण महाराष्ट्र राज्यात सुमारे १३ हजार ५०० किलोमिटरचे भ्रमण करीत यावल तालुक्यात आलेल्या कोल्हापुर जिल्ह्यातील   नितिन नावनुरकर यास महसुलतर्फ प्रभारी तहसीलदार आर डी पाटील , निवासी नायब तहसीलदार आर के पवार , बामणोद विभागाचे मंडळ अधिकारी देवरे यांनी प्रशंसा करीत त्यास महसुल प्रशासनाने त्याच्या पुढील वाटचालीसाठी  आभारपत्र दिले व नंतर नितिन याने आपल्या रावेर तालुक्याच्या जनजागृती मोहीमसाठी यावलहुन प्रस्थान केले .

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.