सात शिक्षकांची नियुक्ती अखेर बोगस : शिक्षण विभागाकडून अहवाल सादर

यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथील नॅशनल एज्युकेशन सोसायटीव्दारे संचलीत विद्यालयातील शिक्षक भरती प्रक्रिया ही बेकायद्याशीर असल्याचा अहवाल चौकशीअंती आढळून आल्याने पुढील कार्यवाहीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे अहवाल पाठविण्यात आला आहे .

 

शिक्षक भरती प्रक्रिया संदर्भात जिल्हा परिषदेच्या दोन सदस्यीय समितीने नॅशनल एज्युकेशन सोसायटी यावल येथे दि. १४ मे २०२२ रोजी सात शिक्षकांची बोगस भरती संदर्भात स्वतः येऊन सविस्तर चौकशी केली. या समितीत माध्यमिक शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी रागिणी चव्हाण व दिपाली पाटील यांचा समावेश होता. या समितीने सदरची शिक्षक भरती बोगस असत्याचा अहवाल दि. २० जून रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया व माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. नितिन बच्छाव यांच्याकडे सादर केला आहे .
सदरचा अहवाल सविस्तर वाचन करून जिल्हा परिषदचे माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. नितिन बच्छाव यांनी तक्रारदार गुलाम मुस्तफा वगैरे ३ यांना दि. २२ जून रोजी जा. क्रमांक शिक्षण/ माध्यमिक /आर आर/७५२ ‘ २०२२च्या पत्रान्वये असे लेखी स्वरूपात पत्र जाहीर केले आहे. की दि. १४ / ०५/२o२२ रोजी नॅशनल एज्युकेशन सोसायटी अध्यक्ष व संचालक मंडळ यांनी शासनाची फसवणूक करून अनधिकृत संस्था असून शिक्षणाधिकारी माध्यमिक, यांची विना परवानगी घेऊन सात शिक्षकांची नियुक्ती केलेली आहे. तसेच या संपूर्ण भरती प्रकरणात शिक्षक पदासाठीच्या उमेदवारांकडून पंचवीस ते तीस लाख रुपयांची वसूल करण्यात आले असल्याचे सिद्ध झाला असल्याचा अहवालात म्हटले आहे. यामुळे नॅशनल एज्युकेशन सोसायटी अध्यक्ष व संचालक मंडळाच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!