साक्षी पाटील राज्यस्तरीय नारी दीप पुरस्काराने सन्मानित

मुक्ताईनगर, प्रतिनिधी | समाज कार्यात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या साक्षी पाटील यांना खान्देश नारीशक्ती ग्रुप, खानदेश न्यूज नेटवर्क, खानदेश जनसेवा फाउंडेशन आणि इंडियन जर्नालिस्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय नारी दीप पुरस्कार नुकताच जळगाव येथे प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

 

साक्षी पाटील यांनी कमी वयामध्ये समाज कार्यामध्ये विविध प्राविण्य प्राप्त केले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना नुकतेच पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. याप्रसंगी जळगावच्या महापौर जयश्री महाजन. आमदार राजूमामा भोळे, चाळीसगाव येथील आमदार मंगेश चव्हाण, धुळे येथील माजी महापौर जयश्री अहिरराव, ग. स. सोसायटी अध्यक्ष विलास नेरकर उपस्थित होते. साक्षी यांनी हा पुरस्कार त्यांच्या वडिलांसोबत प्रदान केला. साक्षी यांनी या पुरस्काराचे सर्व श्रेय आई वडिलांना दिले, हा पुरस्कार फक्त पुरस्कार नसून समाजाप्रती एक नवं स्वप्न आणि ध्यास आहे आहे. राज्यस्तरीय नारी दीप हा एक स्त्रीत्वाचा उत्सव असून प्रत्येक स्त्रीचा व तिच्या आत्मसन्मानाचा आणि तिच्या कसोटीचा ही केवळ ती स्त्री आहे म्हणून भोगाव्या लागणाऱ्या वेदनेचा आणि ती स्त्री आहे म्हणून अनुभवता येणाऱ्या सर्जनत्वचाही व त्यांच्या हक्कांचा ही हा पुरस्कार आहे असं नारीदीप साक्षी यांना वाटते,

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!