साकळी येथे माझे कुटुंब माझी जबाबदारी अंतर्गत कार्यक्रम

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील साकळी येथे माझे कुटुंब माझी जबाबदारी या कार्यक्रमा अंतर्गत सर्वेक्षणाचा कार्यक्रम जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभाबती रवींद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.

जळगाव जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती  रविंद्र उर्फ छोटु पाटील,  तहसीलदार महेश पवार तसेच यावल पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी नईमुद्दीन कुतुबुद्दीन शेख  यांनी भेट दिली. याप्रसंगी सर्वेक्षण करणार्‍या शिक्षकांना व आरोग्य कर्मचार्‍यांना आरोग्य सभापती रवींद्र पाटील यांनी मार्गदर्शन केले. तसेच तहसीलदार  व गटशिक्षणाधिकारी यांनी नागरिकांनी शासकीय नियमांचे पालन करून स्वतःच्या व इतरांच्या आरोग्याची काळजी घ्यावी व आपली वेळ येईल त्यावेळेस कोवीड लसीकरण करून घ्यावे असे आवाहन मार्गदर्शन केले. 

सर्वेक्षण केंद्र प्रमुख किशोर चौधरी यांनी पंचक्रोशीतील साकळी परिसरात साकळी, शिरसाड, मनवेल, दगडी, थोरगव्हाण व पिळोदा येथील आरोग्य विभागाच्या सर्वेक्षण संदर्भात माहिती दिली. साकळी परिसरातील आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातुन होत असलेल्या कोरोना संदर्भातील जनजागृती व रुग्णांची घेतली जात असलेली काळजी या विषयाची माहिती जाणुन घेतली. याबाबत तहसीलदार महेश पवार समाधान व्यक्त केले व कोरोनाचे उच्चाटन करण्यासाठी प्रशासनास जनजागृती व शासनाच्या नियमांची काटेकोर अमलबजावणी आणी सर्वेक्षण अधिकाधिक प्रभावी करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. याप्रसंगी परिसरातील सर्वेक्षण कर्मचारी, शिक्षक, आशा वर्कर प्रामुख्याने उपस्थित होते.

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.