साकळी येथे पंडित दीनदयाल उपाध्याय यांची जयंती साजरी

शेअर करा !

फैजपूर प्रतिनिधी । येथून जवळ असलेल्या यावल तालुक्यातील साकळी येथे पंडित दीनदयाल उपाध्याय यांची जयंती साजरी करण्यात आली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पंडित दीनदयाल यांच्या प्रतिमेचे पूजन व ध्वजवंदन करण्यात आले.

यावेळी जि.प. शिक्षण व आरोग्य सभापती रविंद्र पाटील, यावल पं.स.उपसभापती दिपक पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. त्याचप्रमाणे यावल पं.स.माजी उपसभापती भास्कर तायडे, यावल तालुका भाजपा युवा आघाडीचे उपाध्यक्ष योगेश खेवलकर, विकासो संचालक सुनिल नेवे, ग्रा.पं. सदस्य साहेबराव बडगुजर, ज्येष्ठ कार्यकर्ते रामकृष्ण खेवलकर, जीवन पाटील, सुरेश बडगुजर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाच्या वेळी कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता सोशल डिस्टन्स ठेवणे सह प्रशासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात आले.

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!