साकळीत विवाहितेचा विनयभंग

 

  यावल  : प्रतिनिधी  ।  तालुक्यातील साकळी गावात एकाने विवाहीत महीलेचा विनयभंग केल्याची घटना घडली

 

पिडीत  महीलेच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे . साकळी ( ता –  यावल ) येथील   एका ३० वर्षीय महीलेस  ती  एकटी असल्याचे पाहुन रेखाबाई   बाविस्कर यांच्या घराजवळ सार्वजनिक ठिकाणी  २६ एप्रिलरोजी   दुपारी गावातीलच  मनोज बिऱ्हाडे यांने  महिलेस पैसे  दाखवुन लज्जा वाटेल असे  कृत्य  केले .

 

फिर्यादी महिलेच्या पतीने  जाब विचारल्यावर  आरोपी मनोज बिऱ्हाडे यांने त्यासही धक्काबुक्की केली व धमकावले महीलेने यावल पोलिसात फिर्याद दिल्याने आरोपी मनोज बिऱ्हाडे विरूद्ध भादवि  कलम ३५४ ( अ ) , ३२३ , ५०४ , ५०६ नुसार विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला  तपास यावलचे पो नि सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो उ नि  जितेन्द्र खैरनार व  अमलदार  करीत आहेत  .

 

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.