सहा वर्षीय चिमुकलीवर अत्याचार; नराधम फरार

शेअर करा !

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील जामुनझिरा येथील सहा वर्षीय चिमुकलीला खाण्याचे आमिष दाखवल २० वर्षीय तरूणाने अत्याचा केल्याची घटना शनिवारी दुपारी घडली याप्रकरणी रात्री उशीरा यावल पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ८ ऑगस्ट २०२० शनिवार रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास संशयीत आरोपी रोहन बिलासिंग पावरा (वय २०) रा.जामुनझिरा ता. यावल याने सह वर्षीय मुलीला केळी खाण्याचे आमिष दाखवत केळीच्या शेतात घेऊन जाऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. दरम्यान चिमुलीला आईने विश्वासात घेवून विचारले असता हा प्रकार समोर आला आहे. पिडीत मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात संशयित आरोपी रोहन पावरा याच्या विरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही घटना घडल्यानंतर संशयित आरोपी हा फरार झाला आहे. पुढील तपास पोलिस निरिक्षक अरुण धनवडे यांच्या मार्गदर्शना खाली पोउनि सुनिता कोळपकर या करीत आहेत. दरम्यान त्या पिडीत चिमकुलीस वैद्यकीय तपासणीस करीता जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वैद्यकीय विद्यालयात पाठविण्यात आले आहे.

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!