सहकार पॅनलच्या विजयासाठी पालकमंत्र्यांचे आवाहन

जळगाव, प्रतिनिधी|  जळगाव जिल्हा बँकेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या सहकार पॅनलला विजयी करण्याचे आवाहन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले आहे.

 

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत महाविकास आघाडीच्या सहकार पॅनलला आधीच स्पष्ट बहुमत मिळाले आहे. २१ पैकी ११ जागा बिनविरोध निवडून आल्या असून उर्वरित १० जागांसाठी रविवार दिनांक २१ नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. या पार्श्‍वभूमिवर, पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी सहकार पॅनलला विजयी करण्याचे आवाहन केले आहे.

या संदर्भात जारी करण्यात आलेल्या निवेदनात ना. गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे की, जेडीसीसी बँकेत आधीच आमचे अकरा सदस्य बिनविरोध निवडून आले असून उर्वरित जागांवरही आमच्याच उमेदवारांना मतदारांनी विजयी करावे. जेणेकरून मोठ्या बहुमताच्या माध्यमातून आम्ही शेतकर्‍यांची सेवा करू शकू. जळगाव जिल्हा बँक ही शेतकर्‍यांची बँक असून या माध्यमातून महाविकास आघाडी शेतकर्‍यांच्या हितासाठी कटीबध्द असल्याची ग्वाही देखील ना. गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवारांना कौल देण्याचे आवाहन पालकमंत्र्यांनी केले आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!