सलग सुट्यांमुळे एटीएम मध्ये खडखडाट

भर उन्हात नागरिकांना करावी लागते एटीएमवर भटकंती

जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी – सलग सुट्यांमुळे शहरासह जिल्हाभरात सर्वच एटीएम मध्ये चलनी नोटांचा खडखडाट झाला आहे. त्यामुळे नागरिकांना भर उन्हात पायपीट करत एका एटीएमवरून दुसऱ्या एटीएमवर भटकंती करावी लागत असल्याचे चित्र आठवड्याच्या सुरवातीलाच दिसून आले.

आर्थिक वर्ष मार्चअखेर सर्वच बँक, सोसायट्या, पतपेढ्या, अर्थपुरवठा करणाऱ्या संस्था त्यांचे आर्थिक व्यवहार ताळेबंद पूर्ण करण्यासाठी धडपडत आहेत. आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी येणी असलेल्या रकमांचे कर्ज खाते बेबाकी करण्यासाठी लक्षाधीशांपासून ते सर्वसामान्य नागरिकांना घाई झालेली असते. गेल्या सप्ताहात चौथा शनिवार आणि रविवार सलग सुट्यामुळे बहुतांश बँकांच्या एटीएम मध्ये चलनी रकमेचा भरणा झालेला नाही. त्यामुळे शहरातील राष्ट्रीयकृत बँकांसह खाजगी बँकांच्या एटीएम मध्ये चलनी नोटांचा खडखडाट झाला आहे. त्यामुळे अनेक नागरिकांना पैसे काढण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत असल्याचे चित्र दिसून आले आहे. त्यातच राष्ट्रीयकृत बँकांच्या खाजगीकरण विरोधात सर्वच बँक कर्मचाऱ्यानी केंद्र सरकारच्या धोरणाचा निषेध म्हणून दोन दिवसीय संप पुकारला आहे. त्यामुळे सर्वच नागरिकांना आर्धिक देवाण-घेवाण करण्यास अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!