सलग दुसऱ्या दिवशीही अतिक्रमणावर धडक कारवाई (व्हिडिओ)

जळगाव , प्रतिनिधी | शहरात आज सलग दुसऱ्या दिवशी अतिक्रमण निर्मुलन कारवाई करण्यात आली. यात शनिपेठ परिसरातील अतिक्रमण काढण्यात आले.

 

जेसीबीच्या सहाय्याने अतिक्रमण काढण्यात आले. यात शिव भक्त तरुण सांस्कृतिक मंडळ संचालित शिव भक्त व्यायाम शाळेचे अतिक्रमित कंपाऊंडवाल जेसीबीच्या सहाय्याने तोडण्यात आली. यासह परिसरातील ओटे देखील तोडण्यात आलेत. दरम्यान, जय मायक्का देवी रिक्षा टाॅपची कमान तोडण्यात आली. ही कारवाई नगररचना व अतिक्रमण विभागाने संयुक्तपणे कारवाई करण्यात येत आहे. तर सफाई कामगारांचे १५ ते २० घरे तोडण्याचे काम सुरु आहे. कारवाई दरम्यान, आयुक्त सतीश कुलकर्णी उपयुक्त श्याम गोसावी यांनी भेट देवून पाहणी केली. यावेळी अतिक्रमण अधीक्षक इस्माईल शेख, नगररचना विभागाचे प्रसाद पुराणिक, अतुल पाटील, बांधकाम विभागाचे मनीष अमृतकर, सुभाष मराठे, नाना कोळी, जमील शेख आदींच्या पथकाने ही कारवाई करण्यात येत आहे.

भाग १

भाग २

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!