सर्व शक्ती सेना महाराष्ट्रच्या वतीने शहिद भगतसिंग यांना अभिवादन

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील सर्व शक्ती सेना महाराष्ट्रच्या वतीने शहिद दिनानिमित्त क्रांतिकारी भगतसिंग यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक मधुकर मोरे हे होते. तर कार्यक्रमाचे आयोजन सर्व शक्ती सेना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्रा. संजय मोरे यांच्या पदाधिकारी यांनी केले. प्रथम प्रा.संजय मोरे, मयुर कोळी, कृष्णा सावळे, संदीप गाढे यांच्याहस्ते अमर क्रांतीकारी वीर शहीद भगतसिंग यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी प्रा. संजय मोरे यांनी शहिद भगतसिंग यांच्या जिवनकार्यालया उजाळा दिला. ते म्हणाले की, भगत सिंग हे खरे देशभक्त होते. ज्यांनी आपल्या देशाला वाचविण्यासाठी खुप संघर्ष केला. आणि अवघ्या वयाच्या २२ व्या वर्षी फाशीची शिक्षा स्वीकारली. महान अमर क्रांतीकारी वीर शहीद भगतसिंग हे आजच्या पिढीतील तरुणांसाठी एक सर्वात मोठा आदर्श आहेत. त्यामुळे शहीद झालेल्या वीरांमध्ये, सर्वात प्रथम त्यांचे नाव घेतले जाते. असे सांगितले.

याप्रसंगी सर्व शक्ती सेना युवक जिल्हाध्यक्ष मयुर कोळी, विद्यार्थी सेनेचे कृष्णा सावळे, रावेर तालुकाध्यक्ष संदीप गाढे, प्रा.सुनील तायडे, रमजान शाह, विशाल मोरे, सिद्धार्थ मोहासे, धनराज कोळी, उमेश तायडे, दीपक चौधरी, दीपक वानखेडे, डॉ.महेंद्र सुरवाडे, युवराज कोळी, अभिजीत तायडे, संजय धनगर, मुकेश धनगर, शौर्य तायडे, सचिन सुरवाडे, अंजली तायडे यांच्यासह आदी उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content