समता सैनिक दल चाळीसगाव तर्फे गरजूंना किराणा वाटप (व्हिडिओ)

शेअर करा !

 

चाळीसगाव, प्रतिनिधी । येथे समता सैनिक दल चाळीसगाव शाखेच्या वतीने ५० बेरोजगार व गरजू कुटुंबांना किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले.समता सैनिक दलाचे राष्ट्रीय संघटन धर्मभूषण बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम ११ जुन पासून सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत झालेल्या चार टप्प्यांत ४५० कुटुंबाना किराणा साहित्य वाटप करण्यात आले आहे.आज वाटपाचा ५ टप्पा होता.

समता सैनिक दल चाळीसगाव तर्फे आजपर्यंत ५०० कुटुंबांना ही मदत पोहचविण्यात आली आहे . याकामी समता सैनिक दलाचे जिल्हा शाखेचे सहकार्य लाभले असल्याचे समता सैनिक दल चाळीसगाव तालुकाध्यक्ष स्वप्नील जाधव यांनी कळविले आहे. त्याच प्रमाणे महेंद्र जाधव ,मनोज जाधव ,सचिन गांगुर्डे ,विकास देशमुख ,प्रमोद गवळे ,संदीप पाटील , राजू शिरसाठ ,अरविंद पाटील, दिपक बागुल यांनी आज याकरिता परिश्रम घेतले. यावेळी कोरोनाचा तालुक्यात वाढता प्रादुर्भाव बघता वेगळ्या पद्धतीने व फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करत किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले.

 

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!