समता नगरातील तरूणाला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण;

रामानंदनगर पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । घराकडे बघण्याच्या कारणावरून तरूणाला मोकळ्या मैदानात घेवून जावू लाकडी दांड्याने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केली. याबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रामानंदनगर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सैय्यद अकबर सैय्यद सलाउद्दीन (वय-२२) रा. वंजारी टेकडी, समता नगर, जळगाव हा तरूण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. शनिवार १८ जून रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास त्या भागात राहणारे सोनू आढळे, सुशांत कोळी, पप्पू आढळे आणि आकाश भालेराव यांनी सैय्यद अकबर याला दुचाकीवर बसवून पठाण बाबाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील मैदानावर घेवून गेले. सैय्यद अकबर याला अश्लिल शिवीगाळ करून ‘तु हमेशा मेरे घर की तरफ क्यू देखता है’ असे म्हणून बेदम मारहाण केली. सोबत असेलेल शुशांत कोळी, पप्पू आढळे आणि आकाश भालेराव यांनी लाकडी दांडक्याने मारहाण करून दुखापत केली. याबाबत सैय्यक अकबर सैय्यद सलाउद्दीन याने रात्री ११ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी सोनू आढळे, सुशांत कोळी, पप्पू आढळे आणि आकाश भालेराव सर्व रा. वंजारी टेकडी, समता नगर, जळगाव यांच्या विरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोपाल देशमुख हे करीत आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content