पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी| आगामी विविध सण आणि उत्सवांच्या पार्श्वभूमिवर येथील पोलीस स्थानकात पोलीस पाटलांची बैठक घेण्यात आली.
आगामी राम नवमी, महावीर जयंती, हनुमान जयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, अक्षय तृतीया व रमजान ईद या सण – उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज रोजी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये तालुक्यातील पोलिस पाटील बंधु भगिनींची बैठक संपन्न झाली.
या बैठकीत पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांनी उपस्थित पोलिस पाटील बंधु भगिनींना सण – उत्सवात घ्यावयाची काळजी तसेच आप आपल्या गावात शांतता कशी राखावी याबाबत सखोल मार्गदर्शन केले. उपस्थित पोलिस पाटील यांनी त्यांना उद्भवणार्या समस्यांबाबत पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्याकडे मत मांडले असता पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांनी उपस्थित पोलिस पाटील बंधु भगिनींना योग्य मार्गदर्शन केले.
या बैठकीस तालुक्यातील पोलिस पाटील बंधु भगिनींना मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकी प्रसंगी पोलिस उपनिरीक्षक योगेश गणगे, राहुल मोरे, गोपनीय शाखेचे पोलिस कॉन्स्टेबल सुनिल पाटील, पोलिस कॉन्स्टेबल गजु काळे, विनोद बेलदार, भगवान बडगुजर, विनोद शिंदे, विश्वास देशमुख, विकास खैरे, सचिन पवार हे उपस्थित होते.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.