सचिन पायलट यांनी काँग्रेस नेतृत्त्वाशी साधला संपर्क ; भेटीसाठी मागितली वेळ

जयपूर (वृत्तसंस्था) कॉंग्रेसचे बंडखोर नेते सचिन पायलट यांनी काँग्रेस नेतृत्त्वाशी संपर्क साधला असून, भेटीसाठी वेळ मागितल्याची माहिती समोर आली आहे.

 

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यासोबतचे मतभेद टोकाला गेल्यानंतर काँग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष आणि माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी अचानक बंड पुकारले होते. सचिन पायलट यांनी आपल्या १८ आमदारांसह जयपूर सोडले होते. त्यानंतर महिनाभरापासून राजस्थानातील संपूर्ण घडामोंडीवर सचिन पायलट हे मौन बाळगून होते. परंतू त्यांनी काँग्रेस नेतृत्त्वाशी संपर्क साधला असून, भेटीसाठी वेळ मागितल्याची माहिती काँग्रेसच्या दोन नेत्यांनी दिल्याचे वृत्त हिंदुस्थान टाइम्स प्रसिद्ध केले आहे.

Protected Content