फ़ैजपूर, प्रतिनिधी । साकळी दहिगाव गटात शिक्षण व आरोग्य सभापती रविंद्र सुर्यभान पाटील यांच्या जिल्हा नियोजन समिती निधीतून नवीन ट्रान्सफॉर्मर(डीपी) मंजूर करण्यात आलेले आहे
थोरगव्हाण ता. यावल तेथे ट्रान्सफॉर्मर(डीपी) चे उदघाटन जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती रविंद्र सुर्यभान पाटील व यावल पंचायत समितीचे उपसभापती दीपक पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजपाचे कार्यकर्ते विनोद कृष्णा पाटील, बाळू पाटील, यादव चौधरी, बाळू शिंपी, प्रमोद सपकाळे, विनोद भालेराव, व योगेश भालेराव उपस्थित होते. जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती रविंद्र सुर्यभान पाटील यांनी जिल्हा नियोजन समिती सभेत नविन डीपीची मागणी केली होती. या मागणीची तात्काळ दखल घेत साकळी दहिगाव गटात नवीन ट्रान्सफॉर्मर(डीपी)मंजूर करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना शेतात काम करण्यासाठी नेहमी विजेची कमतरता भासत होती. संपूर्ण गटात नवीन डीपी बसवण्याचे काम सुरू आहे तर काही ठिकाणी नवीन ट्रांसफार्मर बसवली जाणार आहे. यामुळे शेतात काम करण्यासाठी लागणारी मुबलक विज वापरता येणार असून शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे. त्याचप्रमाणे तीन ठिकाणी नवीन गुरांचा उपचारासाठी खोडा देखील उपलब्ध करण्यात आले आहे.