संविधान दिनानिमित्त संविधान जागर रॅलीचे आयोजन

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | संविधान दिनाचे औचित्य साधुन शनिवार दि. २६ नोव्हेंबर  रोजी सकाळी ९ वाजता संविधान जागर समितीच्यावतीने संविधान जागर रॅलीचे आयोजन करण्यात आलेले आहे.

 

संविधान जागर रॅलीचा प्रारंभ  रेल्वे स्टेशन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासुन होवून  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या  शिवतीर्थावरील पुतळ्याजवळ रॅलीची सांगता होणार आहे.  रॅलीच्या प्रारंभी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील रॅलीसाठी उपस्थित असणाऱ्या जनसमुदायासमोर संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन करणार आहेत. तसेच  रॅलीस हिरवी झेंडी दाखवणार आहेत. तरी तमाम संविधानवादी नागरिकांनी रॅलीस उपस्थिती देऊन रॅलीस उपस्थिती द्यावी असे आवाहन संविधान जागर समितीचे प्रमुख संयोजक मुकुंद सपकाळे,  सचिव हरिश्चंद्र सोनवणे, सहसचिव अमोल कोल्हे, भारत ससाणे, फारुख शेख, दिलीप सपकाळे, रमेश सोनवणे, राजू मोरे, सरोजिनी लाभणे, रंजीता तायडे, महेंद्र केदार, चंदन बिऱ्हाडे यांनी केलेले आहे.

 

Protected Content